जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर यांची दशाक्षरी काव्यरचना
अजुनही मनी आहे कळ
तुझ्या स्पर्शातला परिमळ
कुठेतरी तरंगत येतो
अलवार भावनांचा झोळ…..
ओल्या वाळुतली रेष एक
अजुनही रुतलेली आहे
चिखलातले शंख शिंपले
गाभार्यात जपुन मी राहे….
पापणीच्या पंंखावर थेंब
रेंगाळतो स्मृतींच्या किनारी
कुठल्याशा प्रवाहात धक्के
लागतात मनाच्या जिव्हारी……
भंगलेल्या स्वप्नांचे तुकडे
कितीवेळा वेचले जोडले
परी सारे अपूर्ण राहिले
कोर्या पानावर नाकारले…..
काळ सारा पसरुन गेला
समांतर क्षितीजे जाहली
बदलले आपले प्रवाह
त्यांत एक नाव रे बुडाली…..
*सौ. राधिका भांडारकर*
*पुणे*