जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना
पुन्हा जन्म घेऊ सखी आंस अधुरी
तू या किनारी मी त्या किनारी
तू तिथे लाविता ज्योत सांगेल समई
इथे दूर अंधार हलकेच हृदयी
तुझे सूर भिडतील माझ्या जिव्हारी
जशी सांजवेळी कुठे एकतारी
तू या किनारी मी त्या किनारी
जागे पणी सुखाची मज स्मरतील स्वप्ने
सुचतील कां ग तुला हीच वचने
होतील कां नव्याने भेटी निवांत प्रहरी
असा सूर गन्धार घेऊन अधरी
तू या किनारी मी त्या किनारी
नातेच प्रिये आपुले गाईल कुणी गाणी
सांगेल चन्द्रमाही सागरा कहाणी
शतजन्म शोधु आपुल्या प्रीतीची शिदोरी
राधाच वृंदावनी तू होईन मी मुरारी
तू या किनारी मी त्या किनारी
अरविंद