You are currently viewing कोल्हापूर येथे बोलेरो पिकप आणि अशोक लेलँड दोस प्लस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

कोल्हापूर येथे बोलेरो पिकप आणि अशोक लेलँड दोस प्लस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

अपघातात ओटवणेतील तरुणाचा मृत्यू

बोलेरो पिकप आणि अशोक लेलँड दोस प्लस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास घडली. मृतात अशोक लेलँड दोस चालक ओटवणे येथील चंद्रकांत उर्फ बाबर कृष्णा गावकर (५६) यांचा समावेश आहे.

हा अपघात कागल कापशी रोड येथील शेंडूर तिठा बामणी गावात आर के मंगल कार्यालय नजिक घडला. चंद्रकांत गावकर हे सिंधुदुर्ग ट्रान्सपोर्ट चा माल घेऊन सावंतवाडीत येत असताना हा अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की या दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचा अक्षरसा चेंदामेंदा झाला होता. त्यात हे दोन्ही चालक अडकून राहिले होते. बोलेरो पिक अप चालक संतोष पवार शनिवार पेठ कोल्हापूर यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात त्यांचाही मृत्यू झाला. बोलेरो पिकप चालकाचा सहकारी वैभव राऊत यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर शाहूपुरीत सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

या अपघाताची माहिती गुरुवारी रात्री उशिरा ओटवणे गावात पोहोचताच ओटवणे गावठण वाडी मंडळाचे अध्यक्ष उमेश गावक,र पोलीस पाटील शेखर गावकर, बाळा गावकर, प्रमोद गावकर, आकाश मिस्त्री, अमोल गावकर, तात्या गावकर आदी ग्रामस्थ तात्काळ कोल्हापूर येथे रवाना झाले. चंद्रकांत गावकर यांच्या निधनाचे वृत्त शुक्रवारी सकाळी गावात समजताच गावावर शोककळा पसरली.

सर्वांना अपघाती मृत्यूचा धक्काच बसला. गेली अनेक वर्षे चंद्रकांत गावकर हे विनाअपघात चालक म्हणून सिंधुदुर्ग ट्रान्सपोर्टवर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, भाऊ, बहीण, भाऊजय असा परिवार आहे.*सावंतवाडी, दि-२४ :-* बोलेरो पिकप आणि अशोक लेलँड दोस प्लस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्री सुमारे साडे दहाच्या सुमारास घडली. मृतात अशोक लेलँड दोस चालक ओटवणे येथील चंद्रकांत ऊर्फ बाबल कृष्णा गावकर (५६) यांचा समावेश आहे. हा अपघात कागल कापशी रोड येथील शेंडूर तिठा बामणी गावात आर के मंगल कार्यालय नजीक हा अपघात घडला.
चंद्रकांत गावकर हे सिंधुदुर्ग ट्रान्सपोर्टचा माल घेऊन सावंतवाडीत येत असताना हा अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की या दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. त्यात हे दोन्ही चालक अडकून राहिले होते. बोलेरो पिकप चालक संतोष पवार (शनिवार पेठ कोल्हापूर) याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात त्यांचाही मृत्यू झाला. बोलेरो पिकअप चालकाचा सहकारी वैभव राऊत याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर शाहूपुरीत सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू या अपघाताची माहिती गुरुवारी रात्री उशिरा ओटवणे गावात पोहोचताच ओटवणे गावठाणवाडी मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर, पोलीस पाटील शेखर गावकर, बाळा गावकर, प्रमोद गावकर आकाश मेस्त्री, अमोल गावकर, तात्या गावकर आदी ग्रामस्थ तात्काळ कोल्हापूर येथे रवाना झाले. चंद्रकांत गावकर यांच्या निधनाचे वृत्त शुक्रवारी सकाळीच समजताच ओटवणे गावावर शोककळा पसरली. सर्वांनाच त्यांच्या अपघाती मृत्यूचा धक्काच बसला. गेली अनेक वर्षे चंद्रकांत गावकर हे विना अपघात चालक म्हणून सिंधुदुर्ग ट्रान्सपोर्टवर कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव घेऊन ग्रामस्थ ओटवणे गावी निघाले आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, भाऊ, बहीण, भावजय असा परिवार आहे. येथील चेतन आणि चंदन गावकर यांचे ते वडील होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा