सिलेंडरच्या मदतीने विझवील्याने अनर्थ टळला
सिंधुनगरी
जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभाग बसविण्यात आलेल्या एसी मशीनला अचानक आग लागल्याची घटना विभागातील कर्मचाऱ्यांना समजतात लागलीच बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले त्यानी आग प्रतिबंधात्मक फायर सिलेंडर च्या सहाय्याने पेटता मशीन मधील आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला ,यामुळे पुढील अनर्थ टळला.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांच्या केबिनच्या पाठीमागे एसी मशीन बसविण्यात आली आहे आज दुपारी बाराच्या दरम्यान केबिन च्या पाठीमागे जळल्या सारखा वास येऊ लागला व त्यातून धूरही पसरू लागला यामुळे कार्यालयात बसलेले विनायक ठाकूर यांनी आपल्या बाजूच्या कर्मचाऱ्यांना त्याची कल्पना दिली कर्मचारी काणकेकर यानी बांधकाम विभागातील वीज तंत्री वायरमन कर्मचारी हरमलकर यांना पाचारण केले त्यांनी विभागाच्या लगत असलेल्या खोलीचा दरवाजा उघडून आत मध्ये असलेल्या खिडकी मधून पाहिले असता एसी मशीन मधून आग येऊ लागले असल्याचे दिसून आले त्यांनी लागलीच आग प्रतिबंधक फायर सिलेंडर आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला .
स्वच्छता विभागाच्या दरम्यान एसी मशीन ला आग लागल्याची कल्पना समजतात लघु पाटबंधारे, महिला बालकल्याण आणि अन्य विभागातील कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती काही अर्ध्या तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात बांधकाम विभागाचे कर्मचारी हरमकर यांना यश आल्याने व तेथील वीज प्रवाह खंडित केल्याने कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्याने सुटकेचा निश्वास टाकला पुढील अनर्थ टाळला जिल्हा परिषदेच्या काही विभागात अशा प्रकारे वारवारशॉर्टसर्किटने आग लागण्याचे प्रकार यापूर्वीही घडल्याचे वृत्त असून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या केबिन दरम्यानही तसेच तळमजल्यावर असलेल्या वीज प्रवाह डी.पी प्रणाली नादुरुस्त अवस्थेत असल्याने ती बदलण्यासाठी चार लाखाची आवश्यकता असल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते काही दिवसांपूर्वी ही वीज प्रवाह प्रणाली सुचित करण्यात आली आहे सततच्या या शॉर्टसर्किट चा परिणाम जिल्हा परिषद आतील काही विभागांना सहन करावा लागत असून विज यंत्रणेमार्फत येथील तांत्रिक त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे