You are currently viewing पत्रकारांनी केला तहसीलदार कार्यालय परिसर चकाचक…

पत्रकारांनी केला तहसीलदार कार्यालय परिसर चकाचक…

स्वच्छता मोहिमेत तहसीलदार आर. जे. पवार, नगरसेविका मेघा गांगण व पत्रकार मित्र झाले सहभागी….

कणकवली

तालुका पत्रकार समितीच्यावतीने येथील तहसीलदार कार्यालय परिसरातील स्वच्छता मोहिम गुरूवारी राबविण्यात आली . तालुका पत्रकार समिती सदस्य, तहसीलदार आर. जे. पवार व तहसील कर्मचारी तसेच नगरसेविका मेघा गांगण यांनीही यात सहभागी होत सहकार्य केले. सुमारे अडीज तास राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत तहसीलदार कार्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. तालुका पत्रकार समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आल्यानुसार गुरूवारी सकाळी ८ वा.पासून या मोहिमेची सुरूवात करण्यात आली.

यावेळी तहसीलदार आर. जे. पवार, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, नगरसेविका मेघा गांगण, जिल्हा उपाध्यक्ष रमेश जोगळे, तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई, तालुका सचिव संजय राणे, खजिनदार नितीन कदम, ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, अशोक करंबेळेकर, जि. कार्यकारिणी सदस्य सुधीर राणे, माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत भावे, भगवान लोके, संतोष राऊळ, मंडळ अधिकारी मेघनाथ पाटील, तलाठी सुवर्णा कडूलकर, कर्मचारी रमेश कांबळे, रणजित चौगुले, महादेव बाबर, मनोज आव्हाड, राजेश चौगुले, बापू जाधव , तसेच बंडू गांगण , सुशिल पारकर , प्रसाद अंधारी , पत्रकार समितीचे संजोग सावंत , तुषार सावंत , भालचंद्र साटम , भास्कर रासम , दिलीप हिंदळेकर , गुरुप्रसाद सावंत , संजय पेटकर , विरेंद्र चिंदरकर , सचिन राणे , हेमंत वारंग , मिलींद पारकर , नंदादीप सावंत , विराज गोसावी , उमेश बुचडे , अनिकेत उचले , तुषार हजारे , दिलीप जाधव , प्रदीप राणे , चंद्रशेखर तांबट , संजय बाणे , संतोष जोगळे , विवेक ताम्हणकर , शशिकांत सातोसे व इतर सहभागी झाले होते .

आर . जे . पवार म्हणाले , ज्यावेळी परिसर स्वच्छ असतो , त्यावेळी कामाचा हुरूप येतो . अशाच प्रकारचे विधायक काम पत्रकारांच्या माध्यमातून होत आहे . शासकीय निधीवर अवलंबून न राहता , अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबविण्याचा आमचाही प्रयत्न राहिल अशा उपक्रमांना आपले नेहमीच सहकार्यही राहिल.

सौ . गांगण म्हणाल्या , सामाजिक बांधीलकीतून समाजाच्या हिताचे उपक्रम राबविले जातात . याचे उदाहरण पत्रकार बांधवांनी दिले असून परिसर स्वच्छतेसाठी पत्रकारांच्या या उपक्रमाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन भविष्यात रोटरी क्लबच्या माध्यमातून असे उपक्रम राबविले जातील . तसेच यासाठी नगरपंचायतीचे सर्व सहकार्य राहिल . गणेश जेठे म्हणाले , तालुका पत्रकार समितीचा हा उपक्रम इतरांनी आदर्श घ्यावा , असाच आहे . या उपक्रमाचे आम्ही कौतुक करतानाच इतरांनीही याचा आदर्श घ्यावा , असे आवाहन त्यांनी केले . तर या उपक्रमात सहभागी झालेल्या तहसीलदार आर . जे . पवार , मेघा गांगण , नगरपंचायत कर्मचारी , तहसील कर्मचारी , पत्रकार संघाचे सदस्य यांचे तसेच सहकार्याबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे यांची आभार तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांनी मानले .

प्रतिक्रिया व्यक्त करा