सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देत आपल्या मित्रपरिवाराच्या साथीने सावंतवाडीतील जनतेच्या मदतीसाठी सदैव कार्यरत असणारे देव्या सूर्याजी म्हणजे देवदूतच….
सामाजिक कार्य हे फक्त आवड म्हणून नव्हे तर ज्या समाजात आपण जगतो, वावरतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो आणि त्याच देण्यातून उत्तराई होण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत देव्या सूर्याजी गेली काही वर्षे सामाजिक कार्य करत आहेत. तारुण्यात मौजमजा करण्यात युवक व्यस्त असतात त्या वयात देव्या सूर्याजी आणि त्याचे मित्रमंडळी अनेक गोरगरीब रुग्णांना आधार देत आहेत. युवा रक्तदाता संघटना उभारून त्यांनी स्वतः कित्येकवेळा रक्तदान केले आहेत, परंतु आपल्या मित्रमंडळींकडून रक्तदान करून घेत अनेकांचे प्राण वाचवले आहेत. सावंतवाडीत रक्तदान शिबिर घेत रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा पडणार नाही याची ते नेहमीच काळजी घेत असतात. एखादं वेळी एखाद्या रक्त गटाचे रक्त उपलब्ध नसेल तर तात्काळ मित्रपरिवाराच्या मदतीने ते रक्तदाता मिळवून देतात त्यामुळे कित्येक सर्वसामान्य रुग्णांसाठी ते देवदूतच ठरले आहेत.
कोरोनाच्या काळात रक्तदानाबरोबरच संपूर्ण सावंतवाडीत विषाणू प्रतिबंधक फवारणी करून रोगमुक्त सावंतवाडी ठेवण्यास मोलाचा हातभार लावला आहे. कोरोनाच्या काळात अनेकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत, अनेक रुग्णांना ते मदतही देतात. जिल्ह्यातील आरोग्याची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने जिल्ह्यातून कोणीही मदतीसाठी हाक दिली असता धावून जाणारे देव्या सूर्याजी हे खरेखुरे कोरोना योद्धा आहेत.
समाजाप्रती सामाजिक बांधिलकी म्हणून दिवसरात्र मेहनत घेत सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणाऱ्या देव्या सूर्याजी यांचा आज वाढदिवस.
ईश्वरत्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देवो याच संवाद मिडियाकडून शुभेच्छा…💐