कणकवली
जिल्हा बँकेची धुरा सतीश सावंत व त्यांच्या सहकार्यांनी चांगल्या पद्धतीने सांभाळली आहे. बँकेच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात आलेल्या आहेत. या योजनांचा जिल्ह्यातील गोरगरीबांनी लाभ घेतला असून आता आत्मनिर्भर झाले आहेत. त्यामुळे ही बँक चांगल्या व्यक्तींचा हातात राहणे गरजेचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनेलच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे. तसेच मी या निवडणुकीत उभा असून मला भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन नगरसेवक सुशांत नाईक यांनी मतदारांना केले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व पदाधिकार्यांनी आपणास उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे जाहीररित्या आभार मानले. तसेच माझ्यासमोर उमेदवार कोण आहे ते पाहण्यापेक्षा मी जिंकण्यासाठी निवडणुकीत उतरलो, असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले.