कणकवली
जिल्हा बँकेत परिवर्तन होणे आवश्यक आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्याचा सर्वात मोठा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होईल.देशाचे सहकार मंत्री अमित शहा आहेत,त्याचा फायदा बँकेला व नागरिकांना करण्यासाठी आम्ही आहोत. जिल्हा बँकेने रोजंदारीवर काम करणाऱ्या तरुण-तरुणींना केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेऊन आम्हीच परमनंट करू शकतो.आम्हाला आमचे नेते ना.नारायण राणे यांची आचारसंहिता आहे.त्यामुळे राजकीय आरोपांची उत्तरे ३० डिसेंबरनंतर दिले जाईल असा इशारा भाजपा आ.नितेश राणे यांनी दिला आहे.
कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष,पॅनेल प्रमुख राजन तेली,बँक उमेदवार अतुल काळसेकर,महेश सारंग,मनीष दळवी,प्रज्ञा ढवण, गुलाबराव चव्हाण, गुरुनाथ पेडणेकर, विठ्ठल देसाई,गजानन गावडे,कमलकांत कुबल,दिलीप रावराणे,समीर सावंत,बोडस,प्रकाश गवस,बाबा परब,सुरेश चौकेकर,रवींद्र मडगावकर आदी भाजपा पुरस्कृत जिल्हा बँक उमेदवार उपस्थित होते.