जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांची अहिरानी बोली भाषेतील काव्यरचना
नव वरीस वरीस सोनारूपानं घडनं
देख देवबाप्पा माले असं सपन पडनं
चांदीना ना तो उना रथ रथम्हान मी बठनू
देख पायटे पायटे देवबा असं रे घडनं ….
खरं कारे देवबा तू…सुख लईसन ये सी
किद्री गऊत भलता लई ये सी ना तू खुशी
ग न झाये देवा आते ग न व्हयनी परिक्षा
दोन वरीस नि जेल देख भोगी ना रे शिक्षा …
काय दिन दखाडात कोनले बी उचलं तू
काय झाये देवा तुले चावना का इच्चू ?
पोरे करात अनाथ करी बाईले इधवा
घरे उजाडीन गया कितल्या बुडन्यात नावा …
आसू पडतंस देख पोरे अनाथ झायात
दोन वरीस पासून नही निंघनी वरात
गये शिक्षन खड्डाम्हा,असं कसं चाली देवा
तुले भजतसं आम्ही तुनी करतंस सेवा …
काय चुकायनं देवा आते माफ करी टाक
देख अजुनबी भीती देख वाटसना धाक
पोरे फिरू दे मोकया बागबगीचा हासू दे
बालपन खुरटनं त्यासले भन्नाट नाचू दे ….
सुख लईसन ये ना ये ना वाजत गाजत
देख तुनाज भरोसा आते नही रे ताकद
दिंड्या पताका लावसू , तुना लेकरे सेतसं
तुले खांदावर धरी समदी दुनिया नाचसं …
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २१ डिसेंबर २०२१
वेळ : रात्री १०:४६