जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक, कवी प्रो.डॉ.प्रवीण उर्फ जी आर जोशी यांची अष्टाक्षरी काव्यरचना
आतुरता पावसाची
आठवण त्या राधेची
राधा बनते धरती
घननीळ त्या कृष्णा ची
कृष्ण यमुनेच्या तळी
चंद्र चंदनाच्या गाली
तम राधेच्या त्या गळी
तिन्ही सांज परमळी
तरकांचा हात हाती
चंद्र प्रकश्याच्या वाती
चिंब भिजे जलवंती
धरा नभ पांघरती
थंड थंड गार वारा
फुले नभी मोर पिसारा
प्रेमे चुंबी त्या अधरा
झंकारीत सप्त तारा
शब्द स्पर्श रूप हाती
फुलवंती गंध माती
लाजवंती रस राती
राधाकृष्ण गीत गाती
आतुरता पावसाची
जर्द काळ्या त्या मेघाची
तुला आण का मातीची ?
आठवण मदनाची
प्रो डॉ जी आर उर्फ प्रवीण जोशी
अंकली बेळगाव
कर्नाटक