You are currently viewing जिल्ह्यातील जनतेने ई- संजीवनी ओपीडीचा लाभ घ्यावा

जिल्ह्यातील जनतेने ई- संजीवनी ओपीडीचा लाभ घ्यावा

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यातील जनतेला घरी राहून त्यांच्या आजारावर वैद्यकीय सल्ला घेण्यात यावा म्हणुन  ई- संजीवनी ओपीडी ही सुविधा सुरु करण्यात आलेली आहे. तसेच कोविड व नॉन कोविड रुग्णांना घरी सुरक्षित राहुन वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मार्फत उपचार सल्ला मसलत करण्यात यावे.या कार्यक्रमाचा मुळ उद्देश आहे. जनतेने ॲण्ड्रोइड मोबाईल मध्ये ई-संजीवनी ओपीडी हे ॲप इंन्स्टॉल करुन या सेवेचा लाभ घ्यायचा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आतापर्यंत 330 रुग्णांनी घर बसल्या या सेवेचा लाभ घेतलेला आहे.

            हा लाभ घेण्यासाठी डॉक्टरांशी सल्ला मसलत करण्यासाठी खालील टप्यांचे पालन करावे, आपला मोबाईल नंबर सत्यापित, व्हेरीफाय करा. नोंदणी झाल्यानंतर टोकन जनरेट करा. नोटिफीकेशन मिळाल्यानंतर लॉग इन करा. तुमचा नंबर येईपर्यंत वाट पहा व त्यानंतर डॉक्टरांशी सल्ला मसलत करा. ई- प्रिस्क्रीप्शन डाऊनलोड करा . तरी जनतेने तसेच रुग्णांनी ई-संजीवनी ओपीडी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ ध्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा