लालित्य नक्षत्रवेल समूहाचे सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री श्रीकांत धारकर यांचा लेख
खुप दिवसानी फॅमीली सोबत सासु र वाडीला निघालो…
सोबत माझा मुलगा माझी बायको आणि माझे सा डु दोघेही होते..
अकोला या ठिकाणी जायचे असल्यामुळ सकाळीच लगबग सुरु झाली …
सर्वतयारी करून आम्ही सर्वजण निघालो … प्रवास मजेत सुरु होता …. एका ठिकाणी थांबुन.. आलू पराठा चा नास्ता सर्वानी केला… धाबा पण नेहमीचा ओळखीचा होता… पुन्हा ताजेतवाने होउन अकोला कडे प्रयाण … सुखात झाली…
अकोल्याचे सर्व काम …. सर्वाच्या भेटी गाठी घेउन वापसी … बुलडाणा कडे …
साधारण पाच साडेपाचला निघालो … सर्व निघायची तयारी झाली …. सर्वजण गाडीत बसले
मी बसायला जाणार … माझा हात गाडीच्या दरवाज्याचा मधात तेवढ्यात … तेवढ्यात चालकाने गाडीचा दरवाजा धाडकन लावला…. माझा हात बोट सापडली… अरे₹₹₹₹₹₹₹…..
माझा हात…. गेला …..
हात जोप्यात मी ओढला…
तरी फरका जोरात हाताला बसला ….. उजव्या हाताचे तीन बोट …. अटकली… काही समजलेच नाही…
हाताला काही तरी लागले एवढच ….
एक ति व्र कळ… डोक्यात निघाली … गरगरायला लागल …
मळ मळ… व्हायला लागली
खुप कस तरी व्हायला लागल …
सर्वांचे जीव वरखाली ….
काय झाल ?
काय झाल?
काय झाल?
एकच गलका… हुंदका…
वेदनेचा….
मी हळुच हाताच्या बोटाकडे बघीतले…. तर काय … माझे तीनही बोटे चपलेले…
मधल्या बोटावर जास्त मार…
नरव हिर व .. निळ … पडलेल..
तिनही बोटे टम झाली….
एका क्षणात… वेदना सहन करण्याच्या पलिकडल्या…
पण इतराना काही वाटु नये महणुन … काही नाही काही नाही…
म्हणत चला निघुया….
” अहो जास्त लागल का? . सौ
” बाबा जास्त त्रास होउन राहिला का “? चिरंजीव
” अहो चलाबर आपण दवाखान्यात जाउ ” सौ अतिशय काळजीने प्रतेक जण विचार पुस करत होते… त्यातल त्यात माझा … मुलगा… आणि … बायको….
लागल मला वेदना मला होत होत्या…
आणि त्रास त्याना होत होता..
एवढ्या साळ्या गडबडीत…
मला माझ्या सौ च्या
आणि मुलाच्या डोळ्यात…
डोळ्याच्या कडा ओलावलेल्या दिसल्या… त्या दोघाची तगमग
… घालमेल … केविलवाणी …
अवस्था बघुन माझे पण डोळे…
पानावले…
माझ दुखण पार पळुन गेल…
माझ मन अधिक भाउक झाल…
वेदना तर होत होतीच… पण… माझी वेदना मी…. प्रत्यक्ष या दोघाच्या डोळ्यात … बघीतली…
त्या दुःखात ही मला…
एक सुख कारक आनंद मिळाला..
माझ्या साठी …
हो माझ्याच साठी …
माझा मुलगा
आणे माझी बायको…
डोळ्यात अश्रू आणतात…
अजुन काय पाहिजे हो…
माणसाला …
माझ्या वेदनेचे अश्रू …
मी या दोघाच्या डोळ्यात बघीतले…
माझ्यासोबत माझ कुटुंब…
नुसते सुखात च सहभागी नाही…
तर माझ्या दुःखात ही …
सहभागी….. आहे…
हे सर्व बघुन …
माझ मन…
आणि डोळ दोन्ही भरून आले…
माझा वेदनेचा गाव .. दुर राहिला
श्रीकांत धारकर
बुलडाणा