शिवसेनेत सुप्त संघर्ष सुरू आहे,त्यातून अशा घटना घडतात
कणकवली
रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेत आजी मंत्री रामदास कदम आणि मंत्री अनिल परब यांच्यात जसा वाद पेटला आहे तसा वाद पालकमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेटला आहे.आज शिवसेना कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला हा त्या वादातून आहे.शिवसेनेत सुप्त संघर्ष सुरू आहे त्यातून ही घटना घडली आहे. घटना घडली त्या परिसरात सीसीटीव्ही आहेत, त्यात आरोपी भेटतील आणि खरे आरोपीना शिक्षा सुद्धा जाईल मात्र हा सर्व प्रकार अंतर्गत वादातून आहे.असे भाजपा आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
दरम्यान आमदार वैभव नाईक यांच्या वक्तव्याचा समाचार घेतांना आम.नितेश राणे म्हणाले, दहशत आम्ही पसरवितो हा आरोप जुना झाला.लोक कंटाळले हे तुमचे ऐकून. गेली सात वर्षे तुमची सत्ता आहे.पूर्वीचे पालकमंत्री दीपक केसरकर हे गृहराज्यमंत्री होते त्यांनी का तपास केला नाही. आजचे पालकमंत्री सामंत कॅबिनेट मंत्री आहेत करा तपास कोणी रोखले आहे तुम्हाला ? फक्त मीडिया समोर बोलण्यापेक्षा पुरावे दया. असे आव्हान या वेळी आम.राणे यांनी दिले. तर पालकमंत्री उदय सामंत यांना या हल्ल्याची पूर्व कल्पना होती हे माहीत असेल तर जाहीर करावे असे आवाहन केले.