You are currently viewing राज्यस्तर व राष्ट्रीयस्तरावर कला उत्सवात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे यश

राज्यस्तर व राष्ट्रीयस्तरावर कला उत्सवात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे यश

राज्यस्तर व राष्ट्रीयस्तरावर कला उत्सवात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे यश

सिंधुदुर्गनगरी

शालेय शिक्षण व साक्षरता मंत्रालय नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन कला उत्सवाच्या आयोजनामध्ये शास्त्रीय गायन, पारंपारिक गयन, शास्त्रीय संगीत वादन, पारंपारिक लोकसंगीत वादन, शास्त्रीय नृत्य, पारंपारिक लोकनृत्य, द्विमितीय चित्र, त्रिमितीय चित्र/ शिल्प व स्थानिक खेळणी तयार करणे या 9 कला प्रकाराचा समावेश होता. या कला उत्सवामध्ये जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळांमधील इयत्ता नववी ते इयत्ता बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सहभाग घेण्याबाबत अनुपमा तावशीकर प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी आवाहन करण्यात आले होते.

            राज्य स्तरावरील निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी राष्ट्रीय कला उत्सव 2021-22 मध्ये दोन विद्यार्थीनी सादरीकरणासाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये सुधांशू समीर सोमण, एन.एस. पंतवालावलकर जुनियर कॉलेज, देवगड हा शास्त्रीय गायन व प्रतीक्षा निलकंठ मेस्त्री, वराडकर हायस्कूल कट्टा, मालवण ही खेळणी तयार करणे या कला प्रकारात पात्र ठरले आहेत. कला उत्सवाचे कामकाज वर्षा कांबळे यांनी पाहिले आहे. यशस्वी व पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे व शाळेचे प्राचार्य तावशीकर व डायट सिंधुदुर्ग परिवार यांच्याकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.

            सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 44 विद्यार्थ्याने कला- उत्सवात सहभागी झाले हाते. त्यातून उत्कृष्ट 16 विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरावर करण्यात आली होती. राज्यस्तरावर अनुष्का चिऊलकर, तन्मय कोयंडे, मलिष्का लोहार, साईश कांबळी, प्रतिभा मेस्त्री, सर्वेश खांबल, ऋतुजा सुतार, विभास महेश , पुर्वा चांदेरकर, जितेश परब, सुधांशु सोमणे, सावनी शेवडे, मंथन करलकर, आर्या वायंगणकर, हरिदास घेवडे, राजश्री ठाकूर या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. अशी माहिती ए.पी.तावशीकर प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा