जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी दत्तजयंती निमित्त लिहिलेलं दत्तगीत
तुजविण कोणी मज नाही दत्ता
तूचि मायबाप, पालनकर्ता ।।ध्रु।।
जडजीवांचा उध्दार
कराया घेई अवतार
ब्रह्मा,विष्णू,महेश्वर
अनसुया सूता ।।१।।
अज्ञानतिमीर भास्कर
दत्त दत्त दिगंबर
दुरीतदैन्य करी दूर
प्रार्थना तूज दत्ता ।।२।।
ह्रदयाचे व्हावे मंदीर
आत्मा त्रिमुर्ती सुंदर
अंतसमयी यावे ओठी
नाम अवधूता ।।३।।
चंद्रशेखर धर्माधिकारी
वारजे,पुणे
९५११६३५०४६