You are currently viewing समाजकार्य (M.S.W) च्या विद्यार्थ्यांनी सामाजिक भान जपावे – अॅड. नकुल पार्सेकर

समाजकार्य (M.S.W) च्या विद्यार्थ्यांनी सामाजिक भान जपावे – अॅड. नकुल पार्सेकर

सिंधुदुर्ग :

 

राजकीय मंडळी राजकारणा व्यतिरिक्त विचार करताना दिसत नाही. जात, धर्म, पंथ या नजरेतूनच घेतले जाणारे राजकीय निर्णय त्यामुळे समाजमन दिवसेंदिवस कलुषित होत असून अनेक सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. सत्तेसाठी वाटेल त्या थराला जाण्याची प्रत्येक राजकीय पक्षामध्ये ओढाताण लागलेली आहे अशावेळी सामाजिक भुमिका घेऊन समाजात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भूमिका फार महत्त्वाची असून समाजकार्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचे भान ठेवून आणि सजग राहून कार्यरत राहिले पाहिजे असे आवाहन अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते अॅड. नकुल पार्सेकर यांनी केले.

मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राच्या अंतर्गत समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

सामाजिक संस्थाचे विविध क्षेत्रातील काम, समाजाचा मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आणि कामाचे व्यवस्थापन याबाबत माहिती घेण्यासाठी आज या शाखेच्या विद्यार्थिनीनी अटल प्रतिष्ठानला भेट दिली आणि अटल प्रतिष्ठानच्या विविध समाजाभिमुख उपक्रमांची माहिती घेतली.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला समाजकार्य विभागाचे प्रा. अमर निर्मळे यांनी या संस्था भेटीबाबतचे प्रयोजन विषद केले. समाजकार्य अभ्यास क्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीनी आपण हाअभ्यास क्रमच का निवडला याबाबतचे विस्तृत विवेचन केले.

कार्यक्रमाला समाजकार्य विभागाच्या प्राध्यापिका सौ. माया रहाटे, कर्मचारी सौ. गायकवाड, अटल प्रतिष्ठानचे व चाईल्ड लाईनचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा