सिंधुदुर्गनगरी
राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील कुडाळ, वाभवे – वैभववाडी, कसई – दोडामार्ग आणि देवगड – जामसंडे या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने सर्व सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाकरिता अधिसूचित करण्यात आलेल्या नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या सर्व आरक्षित जागा या तात्काळ अनारक्षित करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. वर नमूद केल्यानुसार मुलत: नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता आरक्षित असलेल्या ज्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाच्या होतील. त्या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागा या आरक्षण चक्रानुक्रमे फिरविण्याच्या तत्वानुसार कोणत्या प्रभागात देय होतील हे निश्चित करण्यात यावे.
आवश्यकतेनसार सदर जागांचे महिलांकरिता आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत प्रक्रिया राबविण्यात यावी. सोडत प्रक्रियेमध्ये सर्वसाधारण झालेल्या जागांपैकी कोणत्या जागा सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित होतील हे निश्चित करण्यात यावे. सोडतीनंतर त्यानुसार महिलांकरिता सुधारीत आरक्षण अधिसूचित करण्यात यावे व त्यास योग्य ती प्रसिध्दी द्यावी. सार्वत्रिक निवडणुकामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच सर्वसाधारण पदांकरिता सुरु असलेल्या कार्यक्रमानुसार होणारी मतमोजणी पुढे ढकलण्यात येत असून त्या निवडणुकांची मतमोजणी दिनांक 19 जानेवारी 2022 रोजी होईल.
मतमोजणी पुढे ढकललेल्या ठिकाणी मतपेट्या सुरक्षित ठिकाणी, योग्य त्या पोलीस बंदोबस्तात ठेवण्यासाठी योग्य ती सर्व कार्यवाही संबंधित जिल्हाधिकारी यांनी करावयाची आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने वरीलप्रमाणे अनारक्षित करण्यात आलेल्या जागा या सर्वसाधारण/ सर्वसाधारण महिलाकरिता अधिसुचित करुन भरण्याचा आणि एकत्रित निकाल जाहीर करण्याचा सुधारीत कार्यक्रम परिशिष्ट-3 मधील नगरपंचायतींसाठी या पत्रोसाबतच्या परिशिष्ट-1 व 2 नुसार आयोग जाहीर करीत आहे. सदरील कार्यक्रमास योग्य ती प्रसिध्दी देण्यात यावी. सदर सुधारित कार्यक्रमानुसार सद्या सुरु असलेल्या आचारसंहितेचा कालावधी हा मतमोजणीच्या सुधारीत दिनांकापर्यंत लागू राहील. राज्यामध्ये कोरोना विषाणूची (कोविड-19) महामारी सुरु असल्याने, केंद्र व राज्य् शासनाने ठरवून दिलेल्या निकषांचे तंतोतंत पालन करुन नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम राबवितेवेळी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात याव्यात.