You are currently viewing जिल्ह्यात 5 लाख 60 हजार 966 जणांनी घेतला पहिला डोस

जिल्ह्यात 5 लाख 60 हजार 966 जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 5 लाख 60 हजार 966 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

 यामध्ये एकूण 9 हजार 855 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 191 जणांनी दुसरा डोस घेतला.  9  हजार 991 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 934 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 1 लाख 35 हजार 686 व्यक्तींनी पहिला डोस तर 99  हजार 302 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 60 हजार 830 नागरिकांनी पहिला डोस तर 1 लाख 20 हजार 191 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 2 लाख 44 हजार 604 जणांनी पहिला डोस तर 1 लाख 58 हजार 919 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 9 लाख 56 हजार 503  नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

 जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 10 लाख 60 हजार 500 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 8 लाख 16 हजार  180 लसी या कोविशिल्डच्या तर  2 लाख 44 हजार 320 लसी या कोवॅक्सिनच्या  आहेत. तर 7 लाख 57 हजार  931   कोविशिल्ड आणि 1 लाख 98 हजार 572 कोवॅक्सिन  असे  मिळून  9 लाख  56  हजार  503  डोस देण्यात  आले  आहेत.  सध्या  जिल्ह्यातील  विविध  लसीकरण  केंद्रांवर  एकूण  1  लाख 32  हजार 180 लसी उपलब्ध  असून  त्यापैकी  93  हजार 700 कोविशिल्डच्या  आणि  38  हजार 480  कोवॅक्सिनच्या  लसी  आहेत.  जिल्ह्यात  सध्या  20 हजार 600 लसी  शिल्लक  असून  त्यापैकी  7 हजार 400 कोविशिल्ड  आणि 13  हजार 200 कोवॅक्सीनच्या  लसी   शिल्लक  आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा