गावात खादी ग्रामोद्योग प्रशिक्षणाला प्रारंभ…
वेंगुर्ले
तालुक्यातील वजराट येथील खादी उद्योगाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्फत ऊर्जितावस्था देण्याचे काम सुरू असून यामुळे गावातील नागरिकांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येथील जास्तीत जास्त नागरिकांनी याचे प्रशिक्षण पूर्ण करून आपली व पर्यायाने गावची आर्थिक उन्नती करून घ्यावी व या गावाला खादी उद्योगाची असणारी ओळख देशपातळीवर न्यावी असे प्रतिपादन जिल्हा परिषद महिला व बाल विकास समिती सभापती शर्वाणी गावकर यांनी वजराट येथे केले.
खादी आणि ग्रामोद्योग आयोग राज्य कार्यालय मुंबई महाराष्ट्र, मंडलीय कार्यालय हुबळी यांच्या सौजन्याने व कर्नाटक खादी ग्रामोद्योग सहकारी संघ हुबळी, बेळगाव यांच्या सहयोगाने वजराट येथे खादी ग्रामोद्योग प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. याचा शुभारंभ सभापती शर्वाणी गावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ प्रसाद देवधर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.
यावेळी वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, सावंतवाडी भाजप तालुका उपाध्यक्ष शेखर गावकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, नगरसेवक प्रश्नांत आपटे, वजराट सरपंच महेश राणे, उपसरपंच नितीन परब, सदस्य विजय नळेकर, प्रमिला राणे, शारदा देसाई, वजराट सोसायटी चेअरमन बाबुराव परब, भाजप तालुका चिटणीस नितीन चव्हाण, पेंडुर माजी सरपंच संतोष गावडे, पेंडुर उपसरपंच प्रमोद शिरोडकर, खादी उद्योजक सुधाकर भोसले, खरेदी विक्री संघ संचालक अण्णा वजराटकर, वामन भोसले, माजी सरपंच सूर्यकांत परब, विकास चव्हाण, विजय पेडणेकड, मंगेश परब, वसंत परब, सुर्या घोने, जयसिंग देसाई, सखाराम पेडणेकर, श्री पेडणेकर यांच्यासाहित ग्रामस्थ, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
वजराट येथील या प्रशिक्षणाला खादी ग्रामोद्योगचे गोवा व कर्नाटक राज्य एक्सिकेटीव्ही श्री तांबे यांनी भेट देऊन पाहणी केली. कर्नाटक हुबळी येथील संस्थचे ३ प्रशिक्षक गावातील महिला व पुरुष यांना हे प्रशिक्षण देणार आहेत,असे त्यांनी सांगितले.