फोंडाघाट
फोंडाघाट भाजप चे माजी शहरप्रमुख आणि आमदार नितेश राणे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राजेश शिरोडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज वाढदिवसाचे निमित्त साधत भाजपा च्या स्थानिक नेतृत्वाला कंटाळून जि प सदस्य संजय आंग्रे आणि शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आज फोंडाघाट च्या चारही राजांनी शिवसेना प्रवेश केला असून फोंडाघाट भाजप साठी मोठा धक्का मानला जात आहे.
मागील काही महिन्यांपासून फोंडाघाट भाजपा मधील अंतर्गत धुसफूस आणि स्थानिक नेतृत्वाच्या असहकारा मुळे भाजपा पक्षात कंटाळले असलेले भाजपाचे माजी शहर प्रमुख राजेश शिरोडकर यांच्यासह राजेंद्र मर्ये व राजेश मोर्ये व राजेश पावसकर या फोंडाघाट मधील चारही राजांनी आज राजेश शिरोडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिवसेना नेते सतीश सावंत व जि प सदस्य संजय आंग्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जि प सदस्य संजय आंग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना प्रवेश करत सर्वांनी शिवबंधन बांधले यावेळी राजन नानचे,शिवसेना शहर प्रमुख सुरेश टक्के,शेखर लिग्रस उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेश शिरोडकर यांनी सांगितले आताच्या फोंडाघाट भाजपा मध्ये फक्त राजकारण केले जात असल्याने समाजातील विधायक कामे करण्यासाठी कायम विरोध होत असल्याने आपण माझ्या सहकाऱ्यांन सोबत फोंडाघाट मधील जनतेची विधायक कामे करण्यासाठीच शिवसेना प्रवेश केला आहे आणि माझा शिवसेना नेते सतीश सावंत आणि जि प सदस्य संजय आंग्रे यांच्यावर पूर्ण विश्वास असून यांचे मला येथील जनतेची विधायक कामे करण्यासाठी सहकार्य मिळेल.