You are currently viewing हॉर्सशू क्रॅब (Horseshoe Crab) हा खेकडा कारोना लशीच्या तपासणीत महत्त्वाची भूमिका बजावतोय

हॉर्सशू क्रॅब (Horseshoe Crab) हा खेकडा कारोना लशीच्या तपासणीत महत्त्वाची भूमिका बजावतोय

मुंबई :

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जगभरात लशीसाठी प्रयत्न सुरू असताना आता हॉर्सशू क्रॅब (Horseshoe Crab) हा खेकडा लशीच्या तपासणीत महत्त्वाची भूमिका बजावण्याची चिन्हं आहेत. या खेकड्याची रोगप्रतिकारक शक्ती पाहून शास्त्रज्ञही हैराण झालेत. त्याचं विशिष्ट निळ्या रंगाचं रक्त कोव्हिड-१९ विरोधातील लढाईत आता उपयोगात येण्याची शक्यता आहे. तसेच या खेकड्याची त प्रतिकारशक्ती खूप असते. १९७० मध्‍येच या खेकड्याच्या रक्त लिम्युलस एमेबोसाईट लिजेट (LAL) या टेस्टसाठी वापरण्यास परवानगी देण्यात आली होती. ताप तसंच मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या अनेक बॅक्टेरियांना ओळखण्यासाठी ही टेस्ट महत्त्वाची मानली जाते. अमेरिकेतील एका औषधनिर्माण कंपनीचे प्रमुख जॉन डबजॅक यांच्या हवाल्याने ‘यूएसए टुडे’च्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, औषध कंपन्या ज्या औषधांसह लशी, मेडिकल उपकरणं बनवतात त्यांची गुणवत्ता अधिक वाढवण्यासाठी या टेस्टचं महत्त्व अधिक आहे. विशेष बाब म्हणजे या टेस्टचं नाव हॉर्सशू क्रॅबच्या लिम्युलस पॉलीफेमस या शास्त्रीय नावावरच ठेवण्‍यात आलं आहे.

LAL टेस्टसाठी अमेरिकेत मेरिलँड, व्हर्जिनिया, कॅरोलिना, मॅसेचुसेट्स या चार ठिकाणी प्रोडक्शन केंद्र आहे. लशीच्या सुरक्षा तपासणीसाठी जे काही साहित्य लागेल ते तीन दिवसांतच प्रोडक्शनमधून मिळेल. त्यामुळे कोरोना लशीच्या 5 अब्ज डोसच्या तपासणीसाठीही अडचण राहणार नाही, असं हॉर्सशू क्रॅब या प्रकल्पाचे प्रमुख बर्जेसन यांनी सांगितलं.

कोटींपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे, तर ९ लाखांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जगभरात कोरोना लस बनवण्याची स्पर्धा सुरू आहे. सर्वात आधी कोणतीही लस आली तरी LAL ही टेस्टटच लशीसाठी स्टँडर्ड टेस्ट ठरेल. असा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा