मनसे पदाधिकाऱ्यांनी चिपी विमानतळ येथे केले पुष्पगुच्छ देऊन स्वागत
सिंधुदुर्ग :
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे सपत्निक जिल्हा दौऱ्यावर आले असून सिने अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या मुलाच्या विवाह समारंभास उपस्थित राहणार आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांनी चिपी विमानतळ येथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर,उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे,जिल्हा सचिव बाळा पावसकर,कुडाळ सचिव राजेश टंगसाळी,दीपक गावडे,सचिन ठाकूर,सुंदर गावडे,वैभव धुरी,संतोष सावंत गुरू मर्गज,हितेंद्र काळसेकर,विशाल माडये आदी पदाधिकारी उपस्थित होते.