दोडामार्ग
येथील नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आज प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली.यावेळी दोडामार्गमधील सतराही जागा ताब्यात घेणार असल्याचा दावा श्री तेली यांनी केला आहे.
यावेळी दोडामार्ग भाजप तालुकाध्यक्ष प्रविण गवस, शैलेश दळवी, चेतन चव्हाण, बाळा नाईक, राजू प्रसादी, संध्या प्रसादी, सुधीर दळवी, रमेश दळवी, संतोष नानचे, एकनाथ नाडकर्णी यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .