You are currently viewing सावंतवाडी येथे 18 रोजी समाज साहित्य संमेलन

सावंतवाडी येथे 18 रोजी समाज साहित्य संमेलन

 कविसंमेलनासाठी कवींनी सहभागी होण्याचे आवाहन

समाज साहित्य संघटना सिंधुदुर्गतर्फे शनिवार 18 डिसेंबर रोजी सायं. 5.30 वा. सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात समाज साहित्य संमेलन 2021चे आयोजित करण्यात आले असून या संमेलनात आयोजित करण्यात आलेल्या खुल्या कविसंमेलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्या-जुन्या कवींनी कविता वाचनासाठी सहभागी व्हावे तसेच सहभागी होणाऱ्या कवींनी खालील संपर्क नंबरवर आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि कार्यवाह सरिता पवार यांनी केले आहे.

‘समाज असतो म्हणून साहित्य असतं’ ही कॅच लाईन घेऊन हे समाज साहित्य संमेलन ज्येष्ठ लेखक, साहित्य अकादमीचे सल्लागार सदस्य प्रा डॉ राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली आणि कादंबरीकार प्रा.प्रवीण बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे. पहिल्या सत्रात उद्घाटन आणि समाज साहित्य पुरस्काराचे वितरण होणार असून दुसऱ्या सत्रात नामवंत कवी प्राचार्य डॉ गोविंद काजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली खुल्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

रायगड -रत्नागिरी – सिंधुदुर्ग या कोकण विभागात सर्वाधिक उत्तम कविता ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आज लिहिली जात असून अशा सर्व स्तरातील कवीना एकत्र करून त्यांचे कवितावाचन चोखंदळ रसिकांना ऐकता यावे यासाठी या खुल्या कविसंमेलनाचे आयोजन समाज साहित्य संमेलनात करण्यात आले असून ज्या कवींना आपली कविता सादर करावयाची आहे त्या कवीनी पुढील मोबाईल नंबरवर आपली नाव नोंदणी करावी – संपर्क प्रा. मनीषा पाटील ( 94228 19474) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा