सिंधुदुर्गनगरी
सन २०२२ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता १० वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता १२ वी परीक्षेस खाजगीरित्या फॉर्म नं.१७ भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्याच्या विलंब व अतिविलबं शुल्काच्या तारखा पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत. विलंब शुल्क प्रति विद्यार्थ्यी १०० रुपये स्वीकारुन माध्यमिक शाळांनी ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी अर्ज भरावयाच्या तारीख, तसेच विलंब शुल्क प्रति विद्यार्थ्यी २५रुपये स्वीकारुन कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी अर्ज भरावयाच्या तारीख इयत्ता १२ वी इयत्ता १० वी साठी शनिवार १८ डिसेंबर २०२१ पर्यंत आहे. व माध्यमिक शाळांनी,कनिष्ठ महाविद्यालयांनी अति विलंब शुल्क प्रती विद्यार्थी २० रुपये प्रतीदिन स्वीकारुन विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी अर्ज भरावयाच्या तारीख इयत्ता १० वी व १२ वी साठी रविवार दिनांक १९ डिसेंबर २०२१ ते शुक्रवार दि.२४ डिसेंबर २०२१ असे राहिल.
खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी साठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. ऑफलाईन अर्ज स्वीकाराला जाणार नाही.ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इ.१०वी http://form17.mh-ssc.ac.in इ.१२वी http://form17.mh-hsc.ac.in या वेबसाईटचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सुचना संकेतस्थळावर मराठी, इग्रंजीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. अर्ज भरण्याकरीता शाळा सोडल्याचा दाखला(मूळ प्रत), नसल्यास व्दितीयप्रत व प्रतिज्ञापत्र , आधार कार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. विद्यार्थ्यांनी स्कॅनर किंवा मोबाईलव्दारे कागदपत्रांचे फोटो काढून अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे.भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्याला ई-मेल वर पाठविली जाणार आहे. संपूर्ण अर्जाची प्रिंट आऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहित मुदतीत जमा करावयाची आहेत.
खाजगी विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी शुल्काचा तपशील खालीप्रमाणे आहे. इ.१०वी साठी नोंदणी शुल्क १००० रुपये, प्रक्रिया शुल्क १०० रुपये.व इ.१२ वी साठी नोंदणी शुल्क ५०० रुपये, प्रक्रिया शुल्क १०० रुपये असे असेल. माध्यमिक शालन्त प्रमाणपत्र इ.१० वी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन होणार आहे. विद्यार्थ्यांस त्याच्या पत्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यम निहाय संपर्क केंद्राची यादी दिसेल त्यापैकी एका संपर्क केंद्राची निवड करावयाची आहे. या संपर्क केद्राने पकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज करावयाचे आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ.१२ वी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यानी नावनोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नावनोंदणी करताना विद्यार्थ्याचा पत्ता,त्याने निवडलेली शाखा व माध्यम निहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल त्यामधील एका कनिष्ठ महाविद्यालयाची निवड करावयाची आहे.कनिष्ठ महाविद्यालयाव्दारे परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक,तोडी श्रेणी परीक्षा द्यावयाच्या आहेत. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीयमंडळांनी मार्गदर्शन करावे.
इ १० वी , इ१२वी सन २०२२ खाजगी विद्यार्थ्यी फॉर्म नं १७ ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने Debit Card,Crcdit Card,UPI,Net Banking व्दारे भरणे अनिवार्य राहिल. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. पोचपावतीच्या दोन छायाप्रती संपर्क केंद्राला देण्यात याव्यात. एकदा नाव नोंदणी अर्ज केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्याला परत केले जाणार नाही . नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची (उदा. माध्यम, शाखा, संपर्क केंद्र अथवा अन्य कारणास्तव असल्यास विद्यार्थ्यास पुन:श्च नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल याची नोंद घ्यवी.)
दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या, प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ, कनिष्ठ महाविद्यालय संपर्क केद्र यांचेकडुन माहिती प्राप्त करुन घ्यावी.
विद्यार्थ्याना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागपत्रे संपर्क केंद्र ,कनिष्ठ महाविद्यालयांकडून विर्धारित कालावधीनंतर पर घेवून जाण्याची दक्षता घ्यावी. पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यांनंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे examination form मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी.
ऑनलाईन अर्ज भरताना कोणतीही तात्रिक अडचण आल्यास कार्याययीन वेळेत दूरध्वनी क्र ०२०-२५७०५२०७,२५७०५२०८ वर व तसेच इतर बाबींसाठी २५७०५२७१ वर संपर्क साधावा. अशी माहिती डॉ.शिवलींग पटवे विभागीय सचिव कोकण विभागीय मंडळ, यांनी दिली आहे.