वेंगुर्ला
वेंगुर्ला नगरपरिषद दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात महिला मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले.
यावेळी स्त्रीभ्रूणहत्या व स्त्री जन्माचे स्वागत या विषयावर डॉ. राजेश्वर उबाळे यांनी, कायदे विषयक बाबी यावर अॅड.सुषमा प्रभुखानोलकर यांनी आणि स्त्री आणि सामाजिक जाणीव सद्यकालीन परिस्थिती याबाबत सीमा मराठे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, डॉ. राजेश्वर उबाळे, अॅड.सुषमा प्रभुखानोलकर, साप्ताहिक किरातच्या संपादिका सीमा मराठे, माविम चे जिल्हा समन्वयक नितीन काळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ठुम्बरे, स्वाती मांजरेकर, मनाली परब, अतुल अडसूळ आदी उपस्थित होते. स्वाती मांजरेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतुल अडसूळ यांनी आभार मानले.