सिंधुदुर्गनगरी
१२ वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण झाल्या नंतर काही विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, फार्मसी अशा उच्च व्यावसायिक अभ्यास क्रमास प्रवेश घेतात. प्रवेश प्रक्रियेसाठी त्यांना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असते. विद्यार्थ्यांच्या अर्जांची छाननी करणे, प्रमाणपत्र देणे इ. प्रक्रिया करण्यासाठी समितीला पुरेसा वेळ आवश्यक असतो. हा कालावधी ३-२ महीने एवढा आहे. १२ वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण झाल्या नंतर उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमास व प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये. हा हेतू लक्षात घेवून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सिंधुदुर्ग मार्फत सहज, सुलभ जात प्रमाणपत्र पताळणी हा मार्गदर्शनपर उपक्रम विविध महाविद्यालयात राबविण्यात येत आहेत.
मार्गदर्शन शिबीर – समिती मार्फत शासन आपल्यादारी या उपक्रमा अंतर्गत ‘सहज, सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणी’ यामार्गदर्शन शिबीराचे टोपिवाला हायस्कुल व ज्यु. कॉलेज, भंडारी एज्युकेशन सो. ज्यु.कॉलेज, कणकवली कॉलेज कणककवली, ज्य.महाविद्यालय ऑफ सायन्स कॉमर्स आणि आटर्स एन.एम. विद्यालय खारेपाटण, राणी पार्वतीदेवी महाविद्यालय, कृषी महाविद्यालय किर्लोस ओरस सिंधुदुर्गनगरी, एस.एम.हायस्कुल ज्यु.कॉलेज, कुडाळ हायस्कूल ज्यु. कॉलेज, श्रीमती.न.शा.पंतवालावलकर ज्यु.कॉलेज, देवगड, जवाहर नवोदय विद्यालय सांगेली, ता.सावंतवाडी, सिंधुदुर्ग सैनिक स्कूल ॲन्ड ज्यु. कॉलेज आबोली, पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी, बांदा ज्यु.कॉलेज बांदा, बाळासाहेब खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला, बी.एम.गोगटे कनिष्ठ महाविद्यालय शिरोडा, कै.राजराम मराठे न्यू.इंग्लिश स्कूल फोंडाघाट, दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज दोडामार्ग, दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर तिठा, श्री. वासुदेव सरस्वती विद्यालय, माणगांव, विविध महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबीराचे सन २०१८ ते २०२१ या कालरवधीत आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणच्या मार्गदर्शन शिबीरास १२ वी विज्ञान वर्गात शिकणारे विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच त्या पुर्वी ही प्राचार्य व शिक्षकत्तेर कर्मचारी यांना ही मार्गदर्शन देण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य ग्राहक मंचाच्या वतीने ही ऑनलाईन वेबीनारचे आयोजन करुन मार्गदर्शन करण्यात आले होत.
विविध महाविद्यालयामध्ये शिबीरांचे आयोजन व ऑनलाईन वेबीनारचे आयेजन केल्यामुळे त्याचा फायदा सिंधुदुर्गातील उच्च शैक्षणिक अभ्यासक्रम मध्ये सन २०२१-२२ वर्षामध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना झाला आहे. त्यामुळे त्यांना विहीत मुदतीत ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले. त्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्या बाबत समितीला पुरेसा वेळ मिळाला व त्यांच्या शैक्षणिक जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावांमध्ये गुणवत्तेनुसार निर्णय समितीने देऊन योग्य वेळी जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित केल्यामुळे विद्यार्थ्यांना मध्ये गोंधळ निर्माण झाला नाही.
समिती मार्फत “शासन आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत ‘सहज, सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणी’ या मार्गदर्शन शिबीराचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना झाल्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडतळणी समिती सिंधुदुर्ग यांचे कामकाज सुव्यवस्थिती सुरु राहीले. समिती कार्यालयात कोणत्याही प्रकारचा गोंधळ झालेला दिसुन आला नाही.
समितीचे अध्यक्ष,डॉ.भरत बास्टेवाड, सदस्य तथा उपायुक्त, प्रमोद जाधव व सदस्य सचिव संशोधन अधिकारी,दिपक घाटेव कर्मचारी यांनी मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करुन सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात काम केले. गुणवत्तेनुसार निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना योग्य वेळी जात वैधता प्रमाणपत्र निर्गमीत केली आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्यवसायीक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया चालू आहे. विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळाल्याने अनेक पालक व विद्यार्थ्यांनी समितीचे आभार मानले.अशी माहिती उप आयुक्त समाज कल्याण जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिी यांनी दिली आहे.