नांदगाव
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि नांदगाव व्यापारी संघटना यांच्यावतीने नांदगाव येथे सर्व व्यापाऱ्यांच्या सोईसाठी अन्न सुरक्षा परवाना नुतनीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला होता याला नांदगाव पंचक्रोशीतील व्यापारी वर्गाने उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे . यावेळी अन्न सुरक्षा परवाना नूतनीकरण व नवीन परवाना संदर्भात संबंधित व्यापारी वर्गाचे अर्ज भरून घेण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व व्यापारी वर्गाला अन्न सुरक्षा परवाना नव्याने काढता यावा किंवा त्याचे नुतनीकरण सुलभपणे करता यावे यासाठी जिल्हा व्यापारी महासंघाने संपूर्ण जिल्हाभर विविध बाजारपेठांच्या ठिकाणी अन्न सुरक्षा परवाना कॅम्पचे आयोजन केले होते याच अनुषंगाने नांदगाव येथे आज रविवार दिनांक 12 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव अरविंद नेवाळकर, नांदगाव व्यापारी संघटना अध्यक्ष पंढरी वायंगणकर, सुभाष बिडये, उपाध्यक्ष मारुती मोरये, कमलाकर महाडिक,दाजी सदडेकर , भाई मोरजकर , ऋषिकेश मोरजकर, संतोष बिडये ,संजय मोरये , पप्पी सापळे ,अमिन नावलेकर ,मारुती ऊर्फ बाळा मोरये , मंगेश गुरव ,प्रकाश मोरये , गोविंद म्हसकर, भुषण म्हसकर,रामा मोरये ,बापू जंगले, महेश गुरव ,आदी बहुसंख्य व्यापारी वर्गाने याला उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे .