You are currently viewing १९७१ च्या युध्दात सहभागी झालेल्या माजी सैनिक व शहीदांच्या कुंटूबियांचा उद्या सावंतवाडीत सन्मान…

१९७१ च्या युध्दात सहभागी झालेल्या माजी सैनिक व शहीदांच्या कुंटूबियांचा उद्या सावंतवाडीत सन्मान…

सिंधुदुर्ग सेवा निवृत्त सेवा संघाचे आयोजन; माजी सैनिकांना सजवून काढणार रॅली…

सावंतवाडी

येथील सिंधुदुर्ग सेवानिवृत्त सेवा संघाच्या वतीने १९७१ सालात झालेल्या युध्दात सहभागी होणार्‍या माजी सैनिक व शहीदांच्या कुंटूबियांना गौरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.विषेश म्हणजे त्या माजी सैनिकांना सजवून शहरात प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. हा कार्यक्रम उदया सकाळी १० वाजता होणार आहे.त्यानंतर ११ वाजता प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहीती संघाचे जिल्हाध्यक्ष तातोबा गवस यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे,ब्रिगेडियर सुधीर सावंत,कर्नल लेकराज दास यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.असे त्यांनी सांगितले. श्री गवस यांनी सहकाऱ्यांसह आज सैनिक वस्तीगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी संजय गवस, संजय सावंत,दीपक शिंदे,रुपेश आईर, सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर आदी उपस्थित होते.

श्री गवस पुढे म्हणाले, सैनिकांना येथे सोयीसुविधा नाही. त्यामुळे इमारत उभारण्याचा आमचा मानस आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. नगरपालिकेकडे जागा देण्यासंदर्भात आपण मागणी केली होती. त्या मागणीला सर्व नगरसेवकांनी एकमताने ठराव दिला.त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आहे,असे ते म्हणाले. माजी सैनिकांचा व शहीदांच्या कुटुंबीयांचा सत्कार सोहळा लोकप्रतिनिधीनी किंवा शासन स्तरावर करणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने संघटनेच्या माध्यमातून आणि सावंतवाडीतील प्रतिष्ठित लोकांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे त्यामुळे सैनिकांनी केलेल्या कामाची पन्नास वर्षानंतर त्यांना पोचपावती मिळणार आहे,असेही ते यावेळी म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा