कवितांजली, सदाबहार काव्यांजली समूहांच्या सदस्या कवयित्री सौ.स्वाती गोखले, पुणे यांची अप्रतिम काव्यरचना
अलक्तकाने रंगविल्या मी तुझ्या पाऊलखुणा
मनात वाजे पैंजण, उमटल्या झंकारवीणा
दूर उभा मी समुद्रकिनारी, ऐकू येई गाज
सत्य असे की स्वप्न, काही न कळे आज
कवेत घेतलेस तू मला घट्ट कवटाळूनी
बाहुपाशात तुझ्या विसरून सारे दुःख विरघळूनी
स्वप्नाने माझ्या सत्यात यावे असे आज वाटे
आठवाने तुझ्या, नयनी माझ्या, पूर असा दाटे…
कितीक वर्षे जाहली, तरी प्रीत तीच उरी
चाहूल तुझी लागली, अन् आस तीच अंतरी.
खरंच तुझी होती चाहूल का
तू दिलेली हूल ?
घेता कानोसा कितीक धुंडाळल्या तुझ्या सौंदर्याच्या वाटा…
तरीही रिक्तसा अन् हरवल्या पुन्हा जुन्या प्रीतीच्या लाटा…
सौ.स्वाती गोखले.
पुणे.
सुंदर कविता
खूपच भावपूर्ण कविता