You are currently viewing पर्यावरण ….

पर्यावरण ….

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा अप्रतिम लेख

पर्यावरण पर्यावरण …
जीवन आणि मरण…
नाश पर्यावरणाचा, कारण…
मानवाच्या…. कारवाया …

खूप जिव्हाळ्याचा नि ज्वलंत विषय आहे हा …! खरोखर
मानवाच्या जीवन मरणाशी निगडीत व दुर्लक्ष केले तर समस्त
मानव जातीला कधी ही माफ न करेल असा …

पण याचे कितपत गांभिर्य आपल्याला आहे हा ही प्रश्नच आहे? अहो .. इमारतीच्या कोपऱ्यात थुंकू नका.. ही काही
एकमेकांना सांगण्याची गोष्ट आहे ? किती भयंकर लोक
आहोत आपण की , सार्वजनिक स्वच्छतेची जरा ही तमा
नसावी आम्हाला ….? पशुपक्षी सुद्धा आपली विष्ठा झाकून
टाकून पर्यावरण संरक्षणाला मदत करतात तिथे आम्ही …
…… ? जाऊ द्या काय बोलायचे ? माणूस .. ? तो ही
बुद्धिमान …? काय हक्क आहे आपल्याला बुद्धीमान म्हणवून घेण्याचा ? म्हणून म्हटलं मी .. कितपत गांभिर्य आहे आपल्याला पर्यावरणाचे …?

 

हे असेच दुर्लक्ष करत राहिलो आपण तर … काळ कधीही
माफ करणार नाही आपल्याला … वर एक उदा .फक्त दिले
मी तुम्हाला .. ! अशा हजार गोष्टी आहेत की ज्यांची
आम्हाला मुळीच पर्वा नाही , आणि मला वाटते की फार
बरी गोष्ट नाहीच ..ही ..! ध्वनी , जल, वायु,सर्व प्रकारचे प्रदूषण
आम्ही बिनदिक्कत करतो यात मुळीच शंका नाही …ज

माणसा माणसा … अजून तरी जागा हो …अजूनही वेळ
गेलेली नाही ….

सुमती पवार …
नाशिक
४/१२/२०२१

प्रतिक्रिया व्यक्त करा