माणगाव मधून जुगाराला मिळाला कोणाचा हिरवा सिग्नल?
कुडाळ तालुक्याचे एक टोक असलेल्या माणगाव खोऱ्यातील पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीतील का आलेली येथे आज जत्रोत्सव असून जत्रोत्सवात जुगाराच्या मैफिलीला लवकरच सुरुवात झालेली असून माणगाव दुरक्षेत्रातून कोणत्या भक्ताने जत्रेतील जुगाराच्या बैठकांना हिरवा सिग्नल दिला? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. माणगाव मधील सर्व अवैध धंदे ज्यांच्या नुसत्या येण्याने बंद होतात त्यांच्या असण्याने “का आलेली” जत्रोत्सवात जुगाराच्या बैठका कशा काय सुरू होतात? असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.
“का आलेली” जत्रोत्सवात सुरू असणाऱ्या जुगाराच्या बैठकीची अपडेट संवाद मिडीयाला थेट जत्रेतून मिळाली आहे. त्यामुळे जत्रोत्सवात स्थानिक खाकी वर्दीकडून जुगाराला मिळणाऱ्या परवानगी बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अनभिज्ञ असल्याचेच दिसून येत आहे. संवाद मिडीयाने आपल्या चॅनेलवरून बातमी दिल्यानंतरच जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना माहिती मिळत असल्याने त्यानंतरच वरिष्ठ पातळीवरून कारवाईचे आदेश देण्यात येत आहेत. जिल्ह्यातील जत्रोत्सव हे देवकार्य असल्याने जत्रोत्सवात जुगाराला थारा देऊ नये अशीच सर्वसामान्य लोकांची मागणी असते.