कबड्डी व खो खो खेळाची सद्यस्थिती
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा खोखो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १२ डिसेंबरला सकाळी १० ते १२ यावेळेत हॉटेल मँगो २, मोती तलाव समोर, सावंतवाडी येथे ” सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डी व खोखो खेळाची सद्यस्थिती” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
या चर्चासत्रात जिल्ह्यातील ज्येष्ठ मातब्बर राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू सहभागी होणार असून निवडक स्वयंसेवी संस्था तसेच विविध स्पर्धा आयोजित करणारी अधिकृत क्रीडा मंडळाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
गेली अनेक वर्ष या दोन्ही खेळात होत असलेली पिछेहाट याबाबत गंभीर चर्चा होणार असून पुन्हा एकदा दोन्ही देशी खेळांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी विशेष आराखड्याचे नियोजन सुध्धा करण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी, खेळाडू, पंच, प्रशिक्षक, हितचिंतक तसेच विरोधकांनी या उपक्रमास उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन श्री. नंदन वेंगुर्लेकर, सचिव – सिंधुदुर्ग जिल्हा खोखो असोसिएशन व श्री. प्रसाद अरविंदेकर, अध्यक्ष – सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन यांनी केले आहे..