जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी चंद्रशेखर धर्माधिकारी यांची अप्रतिम काव्यरचना
देवा सांग दारी तुझ्या
किती व्हावी घुसखोरी
धनवान जाती पुढे
रांगेतले हो माघारी
सोन्या चांदीचा देवाला
किती बोलती नवस
भोळ्या भक्तांच्या भक्तीने
जाई पुजला कळस
पाप ताप षडरिपू
सर्वांगात हो रुजले
करावया उतराई
किती देव ते शोधले
दुःखी कष्टी जीव होता
देवपुजा तीर्थाटन
गंगास्नान करूनी ते
करी पापाचे क्षालन
चराचरी आहे देव
उगा शोधत बसतो
शोध आता अंतरंग
आत्मा विठ्ठल असतो
चंद्रशेखर धर्माधिकारी
वारजे पुणे©️