You are currently viewing तांबोळी माऊली देवस्थान वार्षिक जत्रोत्सव आज

तांबोळी माऊली देवस्थान वार्षिक जत्रोत्सव आज

तांबोळी गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज शुक्रवारी 10 डिसेंबरला होणार आहे.
नवसाला पावणारी, माहेरवाशिणी ची पाठीराखी, अशी माऊलीची ख्याती असल्याने या जत्रा उत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर माउलीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकार सह आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर उशिरा मामा मोचेमाडकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा