जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ सुमती पवार यांची काव्यरचना
ही वाट दूर जाते..अवकाश भेदण्या का
हे मखमली हो रान घेऊन साबतीला …
किती शांत चित्त आहे.. चिटपाखरूही नाही
नागीण धावते ती लगबग कित्ती घाई …
भेटून अनंतास गुजगोष्टी ती करील
मखमली पायवाट त्या साठी का धरील ?
एकांत प्रिय तीस मनमंदिरात देव
म्हणते मनात ती ही मज सुंदरचं ठेव …
घाटातला उतार कुठे उंच आहे चढ
थकली असेल का ती चढूनी पहा पहाड
मनमंदिरात काय कैसे पहा कळावे
मार्गस्थ व्हावे आणि तीज संगे हो पळावे…
सांगेल काय गुज तापूनी तप्त झाली
मखमल सोबतीला पण भाजुनी निघाली
सुखदु:ख्खे सारी मजला नाही पहा निराळी
जे भोगता तुम्ही ते सारेच मम बिऱ्हाडी…
मी आहे चराचर मी अंश सृष्टीचा हो
भोगीन सारे भोग फुटणार नाही टाहो
सारे इथे समान नियतीच ठरलेली
आणि हसत वाट …
ती दूर दूर गेली ….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २५ नोव्हेंबर २०२१
वेळ : रात्री १०:४३