You are currently viewing गजाली करू मातीच्या अभियान अंतर्गत नेमळेत शेतीशाळा संपन्न

गजाली करू मातीच्या अभियान अंतर्गत नेमळेत शेतीशाळा संपन्न

सावंतवाडी
गजाली करू मातीच्या अभियान अंतर्गत नेमळे येथे जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा तालुका कृषि अधिकारी कार्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी आयोजित करण्यात आली होती यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र शासन- कृषि विभागाच्या या चांगल्या उपक्रमाबाबत प्रशिक्षणार्थी यांच्या वतीने ग्रा पं सदस्य सुहास पिकूळकर यांनी आभार मानले
रब्बी हंगाम पूर्वतयारी व राष्ट्रीय तृणधान्य विकास अभियान अंतर्गत भात शेतीशाळा प्रक्षेत्र दिन कार्यक्रमात शेतकऱ्यांशी माती परिक्षणाचे महत्व, माती नमुना घेण्याची पद्धत, पिकांच्या सुयोग्य वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये, किफायतशीर शेतीसाठी खतांचे प्रमाण वगैरे घटकांसंदर्भात संवाद जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा सिंधुदुर्ग येथील कृषि पर्यवेक्षक निलेश उगवेकर यांनी साधला या कार्यक्रमात कृषि विभागाच्या योजनांची व कडधान्य पिकांच्या लागवडीची व रब्बी हंगामात श्री पद्धतीने भात लागवड याबाबत मार्गदर्शन कृषि सहाय्यक धनंजय कदम यांनी केले मँगोनेट व आंबा भौगोलिक मानांकन नोंदणीबाबत येथील कृषि सहाय्यक यशवंत गवाणे यांनी माहिती दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कृषि सहाय्यक प्रियाताई निरवडेकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा