सावंतवाडी
प्राथमिक आरोग्य केंद्र निरवडे अंतर्गत उपकेंद्र ओटवणे येथे कार्यरत असणाऱ्या रचना रामचंद्र भालेकर यांना त्यांच्या चांगल्या कामाबद्दल सावंतवाडी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पंचायत समिती सावंतवाडी येथे आरोग्य खात्याचा “सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका “पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी रवींद्र कणसे, तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर, आरोग्य सहाय्यक शंकर परब, संतोष तुळसकर, वैद्यकीय अधिकारी डॉ सुनीता बडे, तृप्ती जाधव, प्रशांत चव्हाण,सभापती निकिता सावंत, पं. समिती सदस्य गौरी पावसकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव करण्यात आला.
२०२१_२२ या आर्थिक वर्षामध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताह हा कार्यक्रम १सप्टेंबर ते ७सप्टेंबर असा राबविण्यात आला होता. आणि या कार्यक्रमातील कामगिरीबाबत आशा दिवस दिनी सावंतवाडी तालुक्यातील उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून तृतीय क्रमांक देत रचना भालेकर यांचा गौरव करण्यात आला. कोरोना कालावधीत रचना भालेकर यांच्या सह त्यांच्या सहकाऱ्यांनीहीउत्कृष्ट काम केले. प्रत्येकाच्या घरी जात प्रत्येकाची आरोग्य तपासणी करणे, लसीचे महत्व पटवून देणे किंव्हा कोरोना महामारिबाबत लोकांमध्ये जन जागृती असो यात कोणतीही कसर न करता अतीशय प्रामाणिक पणे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता चांगले काम केले. आणि हेकरत असताना आशा स्वयंसेविकांचे मुख्य काम जे माता मृत्यू, बाल मृत्यू रोखणे , गरोदर महिलांकडे त्यांच्या तब्बेतिकडे विशेष लक्षदेणे त्यांची विशेषकाळजीघेणे यात कोणतीही कसर न करता काम चोख बजावले.गरोदर महीला नवजात बालक यांची विशेष काळजी घेतली.
यात मानसी नाईक, ज्ञानदा गावकर या आशा स्वयंसेविका बरोबरच रश्मी कविटकर, आरोग्य सेविका श्रीम.नाईक यांनी देखील ओटवणे उपकेंद्रात चांगले काम केले. आणि या सर्व कामांची पोच पावती म्हणून आरोग्य खात्याने रचना भालेकर यांना सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार देवून गौरव केला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी आशा स्वयंसेविकेंच्या कामाबाबत विशेष कौतुक केले तसेच पुरस्कार प्राप्त सेविका यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या . रचना भालेकर यांनाया मिळालेल्या पुरस्काराबाबत त्यांचे विवीध स्थरातूनही कौतुक करण्यात येत आहे.