जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची श्री.विपीन रावत यांच्या अपघाती मृत्यू नंतर लिहिलेली चिंतातूर काव्यरचना..
मृत्यूही फितुर होतो हा भास कुठुन व्हावा
जन्म असा चिंतेचा कां चिते मधून व्हावा
विश्वास ना बसावा
घटना अशी घडावी
ही चूक मानवी कां
नियती तशी म्हणावी
व्रतभंग रक्षणाचा कां त्यांना वधून व्हावा
जन्म असा चिंतेचा कां चिते मधून व्हावा
निष्ठाच धर्म ज्यांचा
कर्तव्य हीच पोथी
पूजा पराक्रमांची विजय तिलक माथी
देशास गर्व साऱ्या ज्यांना बघून व्हावा
जन्म असा चिंतेचा कां चिते मधून व्हावा
अपघात वर्णनांची ही
आतां घडेल चर्चा
पडदा हटेल तेंव्हा
जरी अज्ञात कारणाचा
दुर्दैव प्राण आहुतींचा का यज्ञ घडुन यावा
जन्म असा चिंतेचा का चिते मधून व्हावा
हे मातृभूमी आतां
पाहू नको परीक्षा
जे रक्षणास झटती
त्यांनाच नको शिक्षा
श्रद्धांजली व्यथांची तव पुत्रां कडून धावा
जन्म असा चिंतेचा का चिते मधून व्हावा
मृत्यूही फितुर होतो हा भास कुठुन व्हावा
अरविंद