बंगळुरु – भारताचे CDS बिपिन रावत यांची प्रकृती गंभीर
सीडीएस बिपिन रावत प्रवास करत असलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. बिपिन रावत यांच्यासह १४ जण या हेलिकॉप्टरमध्ये होते.
बंगळुरु – भारताचे सीडीएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे.
तामिळनाडुत ही दुर्घटना घडली. १४ जण या हेलिकॉप्टरमध्ये होते. तामिळनाडूतल्या कुन्नूर परिसरात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. सीडीएस बिपिन रावत यांच्यासह पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आयएएफ पायलट यांच्यासह एकूण 14 लोक हेलिकॉप्टरमध्ये होते. सीडीएस बिपिन रावत हे गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सीडीएस बिपन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत. या हेलिकॉप्टरमधून रावत यांच्या पत्नीसह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. तसंच हेलिकॉप्टरला लागलेली आग आटोक्यात आणण्याचं काम सुरु आहे.
लष्कराचं हेलिकॉप्टर कून्नूर इथं क्रॅश झालं आहे. यात जिवितहानीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत हे हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्यांमध्ये होते असं म्हटलं जात आहे. हवामानामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिपिन रावत यांच्या पत्नीसुद्धा या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होत्या अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.