दोडामार्ग:
कसई-दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत आता रंग भरू लागला असून आजच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.यामध्ये शिवसेनेतून मागच्या निवडणुकीत निवडून आलेले आणि कट्टर शिवसैनिक असलेले संतोष म्हावळणकर यांनी भाजपकडून उमेदवारी दाखल केल्याने शिवसेनेला हा फार मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपच्या उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर या निवडणुकीत १७ ही जागा निवडणून आणू असा विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष प्रवीण गवस यांनी व्यक्त केला.तर दोडामार्ग संतोष नानचे आणि चेतन चव्हाण हे राजकीय प्रतिस्पर्धी होते.तेही यानिमित्ताने एकत्र आल्याने भाजपमधील गट तटाच्या राजकारणाला पूर्णविराम मिळाला असल्याचे दिसून आले.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, उमेदवार चेतन चव्हाण, संतोष नानचे, राजेश प्रसादी, संध्या प्रसादी, श्री.रामचंद्र प्रभाकर मणेरीकर,श्री.सुनिल मनोहर बोर्डेकर,सौ.गौरी मनोज पार्सेकर,सौ.रेश्मा उद्देश कोरगांवकर,सौ.सोनल सुनिल म्हावळणकर,श्री.ओंकार विश्वनाथ फाटक,श्री.देविदास कृष्णा गवस,सौ.संध्या राजेश प्रसादी,श्री.राजेश शशिकांत प्रसादी,श्री.संतोष दिनकर नानचे,श्री.नितिन प्रभाकर मणेरीकर,सौ.ज्योती रमाकांत जाधव,सौ.स्वराली स्वप्नील गवस,कु.क्रांती महादेव जाधव,श्री.चेतन सुभाष चव्हाण,सौ.सुकन्या सुधीर पनवेलकर,सौ.संजना संतोष म्हावळणकर,ज्योती रमाकांत जाधव ( आरपीआय ) आदी उपस्थित होते.