ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे व लक्ष्मीबाई बोडेकर यांच्या विशेष प्रयत्नाने ग्रामपंचायत 15 वित्त आयोगातुन सदर कामे मंजूर
वैभववाडी
सडूरे येथील तांबळघाटी (धनगरवाडी) नळ पाणी व स्मशान शेड या कामाची सरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थित 26 डिसेंबर 2021 रोजी सुरुवात. ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे व लक्ष्मीबाई बोडेकर यांच्या प्रयत्नाने ग्रामपंचायत 15 वित्त आयोगातुन सदर कामे मंजूर झाली आहे. ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेमध्ये तांबळघाटी नळपाणी योजनेचे विस्तारीकरण करणेबाबत चर्चा करण्यात आली होती. व या कामाबाबत मासिक सभेत ठराव करण्यात आला होता.या वेळी संबंधित विभागाच्या अधिकारी यांना ग्रामपंचायतीत श्री काळे यांनी बोलावून घेतले व तांबळघाटी येथे जाऊन सर्व कामाची पाहणी केली. आवश्यक लागणाऱ्या साहित्यांची पूर्तता करण्यासाठी जागेवर जाऊन मोजमापन केले. महावितरण कार्यालयाकडून लागणारे इस्टिमेट, वाडीत लागणारे एकूण कनेक्शन ची माहिती टाकी बसवण्यासाठी साठी लागणारी जागा निश्चित करून त्या टाकीचे ग्रामस्थांकडून दानपत्र किंवा बक्षीस पत्र करून घेणे इतपर्यंत काम नवलराज काळे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वतः केले. त्यानंतर सदर काम मार्गी लागण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता ग्रामपंचायत मधून काळे व बोडेकर यांनी केली. जमिनींचे दानपत्र या सगळ्या बाबींवर अति ग्रामस्थांच्या सहकार्याने सदर कामाला मंजुरी घेण्यात आली व हे काम 06 डिसेंबर 2021 रोजी ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ठेकेदार यांनी सुरू केले. या नळपाणी योजना मुळे 26 ते 30 घरांना नळ घरामध्ये भेटणार आहेत. गेले कित्येक दिवस वाडीच्या खालच्या बाजूला असणारे पाणी माता-भगिनींना डोक्यावर हंडा कळशी घेऊन घरी घेऊन जावे लागत असे परंतु ग्रामपंचायतीच्या या योजनेमुळे प्रत्येकाच्या घरात नळ कनेक्शन पोहोचणार आहेत. त्यामुळे वाडीतील पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रशांत जाधव यांच मोलाचे सहकार्य श्री काळे व बोडेकर यांना लाभले.या कामासाठी हातभार लावणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे काळे आणि बोडेकर यांनी आभार मानले आहेत.
सडूरे शिराळे गावातील 15 वित्त आयोगाच्या अंतर्गत झालेल्या पंचवार्षिक विकास आराखड्यातील विकास कामे देखील मार्गी लागतील त्याचबरोबर प्रभाग नंबर एक मधील रावराणेवाडी, राणेवाडी मेजारीवाडी, तुळशीचे भरड,प्रभाग 3 मधील गावठाण वरचीवाडी (कवटीचा वहाळ) पाणीप्रश्न हा जल जीवन मिशन मधून मार्गी लावण्यासाठी नवलराज काळे प्रयत्न करीत आहेत व रूनझुने वाडीचा पाणी प्रश्न ही लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. तसेच गावच्या इतर विकासकामे देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार ग्रामस्थांनी सहकार्य ठेवावं असा आवाहन ग्रामपंचायत सदस्य श्री नवलराज काळे यांनी केले आहे. या कामासाठी बहुमोल असा वेळ देऊन ग्रामसेवक प्रशांत जाधव, पाणी अभियंता गुरसाळे रावसाहेब, वळंजू रावसाहेब, इंगोले रावसाहेब,बावदाने रामचंद्र गावचे सरपंच व इतर सहकारी सदस्य व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून या कामाला यश प्राप्त झाले असेच सहकार्य सर्वांनी ठेवल्यास येणाऱ्या काळात शंभर टक्के विकास गावाचा होईल असा विश्वास नवलराज काळे यांनी व्यक्त केला आहे.