सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेच्या शास्त्र,कला व वाणिज्य शाखांची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL DATABASE वरुन आणि व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थ्यी (HSC VOCATIONAL STREAM) व सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थ, यावूर्वी नाव नोंदणी प्रमापत्र प्राप्त झालेल्या खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची,ITI(औद्योगिक प्रशिक्षण संस्थव्दारे घेणारे विद्यार्थी) आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीप्रमाणे ऑनलाई पध्दतीने भरावण्यास 25 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत.
नियमित शुल्कासह तारीख शुक्रवार दिनांक 12 नोव्हेंबर 2021 ते 12 डिसेंबर 2021, विलंब शुल्कासह सोमवार दिनांक 13 डिसेंबर 2021 ते दिनांक 20 डिसेंबर 2021 सायंकाळी 5.00 वाजेपर्यत.चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारीखा शुक्रवार 12 नोव्हेंबर 2021 ते शनिवार दि. 25 डिसेंबर 2021 पर्यंत आहे.
उच्च माध्यमिक शाळा , कनिष्ठ महाविद्यालयांची विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिंट लिस्ट जमा करावयाची तारीख सोमवार दिनांक 27 डिसेंबर 2021 राहील. इयत्ता 12 वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यायातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यसाठी खालील महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.
कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने व विशेषत: आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सर्व सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यची दक्षता घेण्यात यावी. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यायांनी नियमित विद्यार्थ्यांची विज्ञान, कला व वाणिज्य शाखांची ऑनलाईन आवेदनपत्रे स्वीकारण्यासाठी SARAL DATABASE मध्ये विद्यार्थ्यांची अद्यायावत नोंद असणे आवश्यक आहे. Saral Data वरुनच नियमित निद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाची आहेत.
व्यवसाय अभ्यासक्रम (HSC Vocational) शाखेच्या नियमित विद्यार्थ्यांची, पुनर्परिक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र (Enrollment certificate)प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, (Private Candidate)श्रेणी सुधार, तुरळक विषय व आय.टी.आय. (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारेTransfer of Credit घेणारे विद्यर्थी) घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्याची माहिती Saral Data मध्य नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रिचलित पध्दतीने ऑनलाईनच भरावयाची आहेत.
नियमित शुल्कासह तसेच विलंब शुल्कासह आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क दोन स्वतंत्र चलनाव्दारे भरण्यात यावे. सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रचलित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्याच्या याद्या दिलेल्या मुदतीतच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात.
सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रचलित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनांची प्रत व विद्यार्थ्यांच्य याद्या दिलेल्या मुदतीतच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी गतवर्षीप्रमाणेच परीक्षा शुल्क संगणकीय चलन Download करुन चलनावरील नमूदप्रमाणे मंडळाच्या Virtual Account मध्ये NEFT /RTGS व्दारे वर्ग करावयाचे आहे. उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांनी NEFT /RTGS व्दारे वर्ग केलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यातून प्रत्यक्ष वजा झाली आहे किंवा नाही तसेच Account Number व IFSC Code चुकीचा नमूद केला गेल्यास सदरची रक्कम परत त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांची राहील.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे Transfer of Credit घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्ध्यांनी उपरोक्त कालावधीमध्ये संबंधित प्रशिक्षण संस्थेव्दारे ऑनलाईन आवेदनपत्र भरणे आवश्यक आहे. सन 2022 मधील परीक्षेसाठी, नोव्हेंबर डिसेंबर 2020 सन 2021 च्या नियमित विद्यार्थ्यांना अथवा सप्टेंबर- ऑक्टोंबर 2021 मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसुधार योजनेतंर्गत आवेदनपत्र भरुन परीक्षेस प्रविष्ठ होता येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणताही पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी श्रेणीसुधार योजनेतंर्गत परीक्षेस प्रविष्ठ होणार नाही याबाबतच्या स्पष्ट सूचना विभागीय मंडळ स्तरावरुन सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात याव्यात. अशी माहिती डॉ. शिवलींग पटवे विभागीय सचिव, कोकण विभागीय मंडळ यांनी केले आहे.