You are currently viewing नवीन कुर्ली ग्रामपंचायत दृष्टीक्षेपात

नवीन कुर्ली ग्रामपंचायत दृष्टीक्षेपात

अनंत पिळणकर यांच्या मेहनतीला मिळतेय यश

फोंडाघाट

नवीन कुर्ली वसाहत या महसूल गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मिती आता दृष्टीक्षेपात असून नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या मागील 12 वर्षांच्या मेहनतीला यश मिळणार आहे.कणकवली पं स कडे पुन्हा एकदा2 डिसेंबर रोजी नवीन कुर्ली विकास समितीच्या स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबत ग्रामस्थांच्या सहिनीशी लेखी मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.

देवघर धरण प्रकल्पात विस्थापित झालेल्या कुर्ली गाववासीयांची फोंडाघाट येथे नवीन कुर्ली वसाहत स्थापन होऊन महसुली गाव म्हणूनही नोंद झाली. 2002 साली स्वतंत्र महसूल गाव म्हणून शासन दरबारी नोंद झाली खरी मात्र तरीही नवीन कुर्ली वसाहतवासियांची स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी मात्र अजूनही प्रलंबित आहे. नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी मागील 12 वर्षे सातत्याने प्रशासन आणि शासन स्तरावर स्वतंत्र ग्रामपंचायती साठी पाठपुरावा केला.

तत्कालीन सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून नियमितपणे नवीन कुर्ली ग्रामपंचायत साठी आपला रेटा चालूच ठेवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या सहकार्याने उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस नेते, विद्यमान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची वैयक्तिक भेट घेत नवीन कुर्ली वसाहत साठीच्या स्वतंत्र ग्रामपंचायती ची आवश्यकता विषद केली होती. याचेच फलित म्हणून नवीन कुर्ली वासीयांचे स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीचे स्वप्न आता दृष्टीक्षेपात आले असून प्रशासकीय पातळीवर नवीन कुर्ली स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीला आता वेग आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा