मुंबई प्रतिनिधी :
मुंबई डबेवाला असोशिएशनचे सुभाष तळेकर यांच्या नेतृत्वाखाली डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरेंच निवासस्थान कृष्णकुंजवर भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंना डबेवाल्यांनी मागण्यांचं निवेदन दिले आहे.भेटीदरम्यान डबेवाल्यांनी मुंबईतील लोकल रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी मिळावी, अशी मुख्य मागणी केली आहे.
मनसेने लोकल सेवा सुरू करण्यासाठी आंदोलन केलं होत. त्यामुळे सरकारने हा इशारा समजून लोकल सेवा पूर्ववत करावी. डबेवालेंच पोट या लोकल सेवेवर अवलंबून आहे. त्यामुळे आता लोकल सुरू न झाल्यास मनसेने वात पेटवली आहे. त्याचा भडका होऊ शकतो. आम्हालाही या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल, असा इशारा मुंबईतील डबेवाल्यांनी राज ठाकरेंच्या भेटीपूर्वी दिला होता. त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंची भेट घेण्यात आली.
मनसेकडून सविनय कायदेभंग करत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी लोकलमधून प्रवास केला. रेल्वे पोलिसांना गुंगारा देत संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, गजानन काळे, अतुल भगत या मनसे नेत्यांनी रेल्वे प्रवास केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करत अटक केली होती. मनसेच्या सविनय आंदोलन करण्यापूर्वी अनेक मनसैनिकांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत.