सोन्सुरेच्या रविराज चिपकरने साकारली कलाकृती
वेंगुर्ले
ओडिसा येथील “आंतरराष्ट्रीय वाळू शिल्प महोत्सवात” सिंधुदुर्गच्या सुपुत्राचा सहभाग घेतला आहे. वेंगुर्ले तालुक्यातील सोन्सुरे येथील वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी या महोत्सवात सुंदर अशी शिल्पकृती साकारली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये वाळू शिल्पकार म्हणून चिपकर प्रसिद्ध आहेत. या आंतरराष्ट्रीय महोत्सवात चिपकर यांनी साकारलेल्या शिल्पकलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान नुकतेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले. त्या वेळी रविराज चिपकर यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना समुद्र किनारी वाळू शिल्पातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली होती. त्या वेळीही त्यांच्या कलेचे सर्वत्र कौतुक झाले होते.