You are currently viewing सावरवाड येथील दुर्धर आजाराने ग्रस्त अक्षय फाटक याला महाराष्ट्र शासन शिक्षक समिती मालवण यांचा मदतीचा हात

सावरवाड येथील दुर्धर आजाराने ग्रस्त अक्षय फाटक याला महाराष्ट्र शासन शिक्षक समिती मालवण यांचा मदतीचा हात

 

वराड सावरवाड येथील कु. अक्षय फाटक याला दुर्धर आजारातून बरे होण्याकरिता सर्जरी साठी पैश्यांची गरज होती. त्यासाठी महाराष्ट्र शासन शिक्षक समिती मालवण परिवारातील पदाधिकारी व सदस्यांनी अल्प कालावधीत जमा केलेल्या रक्कमेचा रु.40000/- चेक आदरणीय भाई, तालुकाध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर सर ,जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे सर, ज्येष्ठ मार्गदर्शक अरुण गोसावी सर, शिक्षक नेते मंगेश कांबळी सर, कोषाध्यक्ष तथा संचालक राजेंद्रप्रसाद गाड सर, तालुका सचिव नवनाथ भोळे सर, तानाजी गावडे सर, दिपक गोसावी सर, राजेंद्र गोसावी सर, मंगेश मेस्त्री सर व मनोहर मालंडकर सर यांनी अक्षयचा भाऊ सचिनकडे सुपूर्द केला.

तसेच सामाजिक बांधिलकीतून अक्षयच्या ऑपरेशनसाठी आर्थिक योगदान देणाऱ्या समिती परिवारातील सदस्यांना तसेच अक्षयला मदत मिळवून देण्यासाठी कार्याध्यक्ष रुपेश गरुड यांनी मोठी मेहनत घेतली. त्याबद्दल तालुका शाखेने मनःपूर्वक आभार मानले. तसेच शिक्षक समितीने अक्षयचे ऑपरेशन सफल होऊन त्याला लवकर बरे वाटावे, अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा