You are currently viewing सेवाभावी सुशिक्षितांना नगरपंचायत निवडणुकात मनसे कडुन संधी दिली जाईल.

सेवाभावी सुशिक्षितांना नगरपंचायत निवडणुकात मनसे कडुन संधी दिली जाईल.

जिल्हाध्यक्ष धीरज परब

मनसे कुडाळ नगरपंचायत निवडणूक संदर्भात कुडाळ तालुका मनसेची बैठक जिल्हाध्यक्ष श्री धीरज परब यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाज भवन येथे पार पडली. सदर बैठकीमध्ये प्रभाग निहाय आरक्षणा संदर्भात चाचपणी करण्यात आली,सेवाभावी वृत्तीच्या समाजसेवी,प्रामाणिक समाजकार्य करू इच्छिणाऱ्या,सुशिक्षित महिला पुरुष उमेदवारांनी नशीब आजमावे, मनसे कडून त्यांना उचित सन्मान आणि संधी दिली जाईल. खर्या सामाजिक क्षेत्रात वेळ आणि संपर्क असणार्याना डावलुन मर्जीतील व्यक्तीना प्रस्थापिताकडुन उमेदवारी दिली जाते. परंतु मनसे कडुन खर्या लोकसंपर्क असणार्याच उमेदवाराचा विचार होईल. सत्ताधारी पक्षाकडून शहरातील अनेक विकासकामे प्रलंबित आहेत,योग्य नियोजनाअभावी जनतेचा कर रुपी पैसा वाया जात आहे.कचरा डेपो,सांडपाणी नियोजन,गटारे,स्ट्रीट लाईट, मनोरंजनाची साधने याबाबतीत प्रशासनाचे तीनतेरा वाजले आहेत.यासर्व बाबींबाबत आवाज उठवण्यासाठी आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी मनसे रुपी उमेदवारांना संधी आहे .असे मत धीरज परब यांनी आजच्या बैठकीमध्ये व्यक्त केले.तसेच हेमंत जाधव आणि बनी नाडकर्णी यांनी आपले विचार माडले .या बैठकीमध्ये माजी संपर्क अध्यक्ष हेमंत जाधव,एस टी कामगार सेना राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी,महिला तालुका अध्यक्ष सुप्रिया मेहता,शहर अध्यक्ष सिद्धेश खुटाळे ,शहर उपाध्यक्ष वैभव परब,सचिव रमा नाईक,उप तालुका अध्यक्ष जगन्नाथ गावडे, साळगाव विभाग अध्यक्ष सूरज घाटकर, केरवडे ग्रा.प सदस्य सुशांत परब,शाखा अध्यक्ष विनीत परब,प्रथमेश धुरी, आदील शहा,सिद्धांत बांदेकर,संकेत पिसे,सागर सावंत यासह मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा