बांदा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले पाऊणे दोन वर्ष बंद असलेल्या शाळा आज शासनाच्या आदेशान्वये इयत्ता पहिलीपासू सुरू झाल्या.या दिवसाची सुरवात बांदा केंद्रशाळेसह सर्वच शाळांमधून उत्साहवर्धक वातावरणात झाली. या दिवशी बांदा केंद्रशाळेत विद्यार्थ्यांवर पुष्पवृप्टी करून जल्लोषी स्वागत केले.
गेले अनेक दिवसांपासून बंद असलेली जिल्हा परिषदेची सर्वाधिक पटसंख्येची शाळेचा परिसर आज विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला होता. अनेक महिन्यापासून बंद असलेल्या शाळा सुरु झाल्याने विद्यार्थी शिक्षक व पालकांचा आनंद ओसांडून वाहत होता. यावेळी कोरोना विषयक घोषणांचे विद्यार्थ्यांच्या हाती दिलेले पोस्टर्स लक्षवेधी ठवले होते. यावेळी मुख्याध्यापक सरोज नाईक ,उर्मिला मोर्ये, रसिका मालवणकर,शुभेच्छा सावंत,रंगनाथ परब, जे.डी.पाटील ,वंदना शितोळे,प्राजक्ता पाटील ,शितल गवस आदि शिक्षक उपस्थित होते.
*पहिलीचा हाऊसफूल वर्ग*
बांदा जिल्हा परिषद शाळेचा पट गेल्या चार वर्षात झपाट्याने वाढला असून शाळेचा पट ३००हून अधिक झाला असून सन २०२१-२२या शैक्षणिक वर्षात पहिलीला तब्बल ६४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून वर्ग हाऊसफुल झाला आहे.