You are currently viewing कणकवली पर्यटन सुविधा केंद्राच्या इमारतचे कुलूप फोडून अज्ञाताने केली नासधूस

कणकवली पर्यटन सुविधा केंद्राच्या इमारतचे कुलूप फोडून अज्ञाताने केली नासधूस

गाद्या व बेडचे नुकसान; नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घेतली दखल

कणकवली

कणकवली नगरपंचायतच्या पर्यटन सुविधा केंद्राच्या एका खोलीच्या दरवाजाचे कुलूप अज्ञाता कडून तोडून केंद्रातील साहित्याची नासधूस करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. समाजकंटकांकडून हा प्रकार करत असताना या खोलीतील गाद्या व बेडचे नुकसान करण्यात आले. मात्र या खोलीतील काही साहित्य चोरीस गेले नसल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

पर्यटन सुविधा केंद्राच्या मुख्य दरवाज्याचे ही कुलूप दगडाद्वारे फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पर्यटन सुविधा केंद्रामध्ये कणकवली नगरपंचायतने अद्यायावत असे कोविड केअर सेंटर सुरू केले होते. त्याचा फायदा अनेक रुग्णांना झाला होता. त्यानंतर आता पुन्हा कोविडच्या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर त्या अनुषंगाने नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून या पर्यटन सुविधा केंद्रातील कोविड केअर सेंटरची साफसफाई करण्याच्या सूचना नगरपंचायत कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. या कोविड केअर सेंटरची साफसफाई करण्याकरिता कर्मचारी गेले असता तेथे हा प्रकार उघडकीस आला. मात्र नगरपंचायतीच्या पर्यटन सुविधा केंद्राची अशी तोडफोड करण्यामागे नेमका उद्देश काय? असा सवाल आता उपस्थित केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांचा शोध घेत त्यांच्यावर कारवाई ची मागणी केली जात आहे.

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, कारवाईच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. या पर्यटन सुविधा केंद्राच्या इमारतीत रुग्णांच्या सोयीसुविधांसाठी ठेवण्यात आलेले अनेक साहित्य आहे. मात्र मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करूनही तो कुलूप फुटले नसल्याने चोरीचा प्रयत्न फसला. त्यामुळे हा प्रकार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करत संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा